सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! दरात सर्वात मोठी घसरण, जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात कमालीचे चढ-उतार दिसून आले. लग्न सराईत मागणी जास्त प्रमाणात असल्याने बाजार पण तशेच होते. मागील अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांकावर मजल मारली होती मात्र, सोने आणि चांदीच्या दरात अलीकडेच पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली जात आहे.

आता सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर चमक दिसून आली. एकाच दिवसात एवढी मोठी घसरण होण्याची या महिन्यातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कोणाला खरेदी करायची असेल तर ही एक चांगली संधी आहे. तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर गेल्या तीन सत्रांमध्ये सोन्याचा भाव ७४,३६७ रुपये प्रति दहा ग्रॅमवरून ७२,१११ रुपयांवर घसरला आहे. यामुळे अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात तफावत बघायला मिळत आहे.

यामध्ये तीन दिवसांत सोन्याची किंमत २,२५६ रुपयांनी स्वस्त झाली. गुरुवारच्या सत्रात सोन्याची स्पॉट किंमत २,३५४.९५ डॉलर प्रति औंस झाली, जी तीन दिवसांची ७१ डॉलर कमी झाले. सोमवारी सोने २,४५० डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले होते. आता या तुलनेत सराफा बाजरात ३.९% पडझड झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये दिल्लीत सोन्याचा भाव १,०५० रुपयांनी घसरून ७३,५५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला जो गेल्या ट्रेडिंग सत्रात ७४,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. तसेच चांदीचा भावही २,५०० रुपयांनी घसरून ९२,६०० रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे. यामध्ये देखील तीन हजारांची घसरण झाली आहे.

तसेच मुंबईत गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,४२० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर जळगाव येथे गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,३०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. यामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. यामुळे ही एक चांगली संधी आपल्यासाठी आहे.