हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांकडून अटक, करोडोंची हेराफेरी झाली उघड, नेमकं काय झालं?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत माहिती अशी की, वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता वैभवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत तपास सुरू आहे.

वैभव पंड्या त्याच्याच सावत्र भावांची ४.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. वैभवसोबत हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांची एका व्यवसायात भागीदारी होती. याबाबत हे प्रकरण आता उघड झाले आहे.

ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल यांचा प्रत्येकी ४० टक्के तर वैभवचा २० टक्के वाटा होता.वैभववर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता ही माहिती समोर आली आहे. २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला.

भागीदारीच्या अटी अशा होत्या की क्रिकेटपटू आणि त्याचा भाऊ प्रत्येकी ४० टक्के भांडवल देतील. तर सावत्र भाऊ २० टक्के भाग देईल आणि फर्म चालवण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल, असे नमूद करण्यात आले होते. तसेच यामध्ये येणारा नफाही त्याच प्रमाणात वाटून घ्यायचा होता. हा नफा प्रत्येक व्यक्तीच्या या व्यवसायातील सहभागानुसार वाटून घ्यायचा होता. मात्र वैभवने तसे केले नाही.

कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभवने वेगळी कंपनी स्थापन केली. तसेच नफा देखील त्याठिकाणीच वळवला. त्याने व्यवसायाच्या भागीदारी कराराचे उल्लंघन केले. यामुळे मुख्य कंपनीचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सावत्र भावाने कोणालाही न कळवता त्याचा नफा २० टक्के वरून ३३.३टक्क्यांपर्यंत वाढवला.