ताज्या बातम्याक्राईमराजकारण

Valmik Karad : वाल्मिक कराडने बीड पोलिसांना वाटल्या नव्या कोऱ्या बुलेट आणि आयफोन, धक्कादायक गौप्यस्फोट

Valmik Karad : आवादा कंपनीकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला बीड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, आणि प्रतीक घुले यांनी खंडणी मागितल्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

विशेष म्हणजे, वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. या प्रकरणामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, कारण तपास अधिक प्रभावीपणे व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी वाल्मिक कराडविरोधात आणखी गंभीर आरोप केले आहेत.

त्यांनी परळीतील पोलीस प्रशासनावरही टीका करत, वाल्मिकने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बुलेट मोटारसायकली आणि आयफोन वाटल्याचा दावा केला आहे. पाटील यांच्या मते, या पोलिसांचा वापर गुन्हेगार त्यांच्या फायद्यासाठी करत आहेत.

भैया पाटील यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (माजी ट्विटर) अकाउंटवर लिहिले, “बीड आणि परळीतील पोलीस प्रशासन सध्या मुंडे आणि कराड यांच्या नियंत्रणाखाली काम करत आहे. वाल्मिकने गेल्या वर्षी अनेक पोलिसांना बुलेट आणि आयफोन दिले आहेत, ज्याचा उपयोग सध्या गुन्हेगारीत केला जात आहे. या पोलिसांना तात्काळ जिल्ह्याबाहेर हलवावे किंवा बडतर्फ करावे.”

याशिवाय, भैया पाटील यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावरही आरोप केला आहे की, ते वाल्मिक कराडचे “फ्रंटमॅन” म्हणून काम करत आहेत. त्यांनी पाठक यांची चौकशी करून त्यांच्या गुन्हेगारी संबंधांचा तपास करण्याची मागणी केली आहे

Related Articles

Back to top button