---Advertisement---

Congress : “काँग्रेस तुमच्या पाठीशी’’, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी मढी येथील मुस्लिम दुकानदारांना दिला धीर

---Advertisement---

Congress : महाराष्ट्राच्या *वारकरी संप्रदायाला सामाजिक ऐक्याची थोर परंपरा आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा या परंपरेचा मूलमंत्र आहे. मात्र, आज केंद्र आणि राज्य सरकार संविधानाच्या विरोधात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष **हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या पार्श्वभूमीवर, राज्यात सद्भावना आणि सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष ‘सद्भावना पदयात्रा’ काढत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मढीमध्ये कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन

हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि स्थानिक दुकानदारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी *मढी ग्रामपंचायतीने यात्रेत मुस्लिम दुकानदारांना परवानगी नाकारण्याचा ठराव मंजूर केला होता, ज्याला सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याने पाठिंबा दिला. हा ठराव *संविधानविरोधी आणि बेकायदेशीर असल्याचे सांगत सपकाळ यांनी मुस्लिम दुकानदारांना आश्वस्त केलं की काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र दळवी, भगवान गडाचे विश्वस्त व काँग्रेस नेते राजेंद्र राख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात गुन्हेगारी वाढली, सरकार गप्प – सपकाळ

भगवानगड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी *राज्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत सरकारवर टीका केली. “राज्यात **कोयता गँग, रेती गँग, मुरुम गँग, आका गँग अशा टोळ्या उभ्या राहत आहेत. जातीय आणि धार्मिक विष पेरून सत्ता मिळवण्यासाठी समाजात तेढ निर्माण केली जात आहे. वाढती गुंडगिरी आणि सामाजिक अस्थिरतेमुळे राज्यात समतोल बिघडत आहे, मात्र सरकार *याकडे डोळेझाक करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

८ मार्चपासून सद्भावना पदयात्रेस सुरुवात

शनिवारी, ८ मार्च रोजी हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सद्भावना पदयात्रेला सुरुवात करतील. ही यात्रा ५१ किलोमीटरचा प्रवास करत *रविवारी, ९ मार्च रोजी सायंकाळी बीड येथे पोहोचेल, जिथे *सद्भावना मेळाव्याने यात्रेची सांगता होईल.

“ही यात्रा कोणत्याही निवडणुकीशी संबंधित नसून, राज्यात सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे,” असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलं.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---