Datta Gade : स्वारगेट एसटी स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. गंभीर गुन्हा केल्यानंतरही आरोपी *दत्तात्रय गाडे तब्बल अर्धा ते पाऊण तास स्थानक परिसरातच फिरत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा वावर स्पष्ट
स्वारगेट एसटी स्थानक आणि परिसरातील *सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत आरोपीचा निर्धास्त वावर दिसून आला आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करूनही **तो कुठल्याही भीतीशिवाय परिसरात फिरत होता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. *गुन्ह्यानंतर तो एका तरकारीच्या गाडीतून सोलापूर रस्त्याने पळून गेला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोबाइलचा शोध आणि पोलिस तपास
पोलिसांनी आरोपी गाडेचा *मोबाइल शोधण्यासाठी गुनाट गावात शोधमोहीम राबवली. शुक्रवारी पोलिस पथक आरोपीला सोबत घेऊन गावी पोहोचले. **आरोपी तीन दिवस शेतात लपून बसला होता, त्यामुळे *त्याने तिथेच मोबाइल फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.
मोबाइलमधून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता
स्वारगेट बलात्कार प्रकरणात *आरोपीचा मोबाइल महत्त्वाचा ठरू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे **गाडे लपलेल्या ठिकाणांची कसून पाहणी करण्यात आली. दरम्यान, *मोबाइल फेकला नसून तो खिशातून पडल्याचा दावा आरोपीने केला आहे, त्यामुळे पोलिसांना शोधमोहीमेत अडथळे येत आहेत.
पोलिस तपास सुरू
वरिष्ठ निरीक्षक *शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. शुक्रवारी सकाळी *५ अधिकारी, पंच आणि ३० कर्मचाऱ्यांचे पथक आरोपीसह गुनाट गावी दाखल झाले. पोलिसांना लवकरात लवकर मोबाइल सापडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.