ताज्या बातम्या

Delhi : स्वत:ची लग्नाची पत्रिका द्यायला गेला, प्रेयसीच्या लग्नाच्या हॉलजवळ आला, आत लग्न अन् बाहेर प्रियकराने…

Delhi : दिल्लीतील गाझीपूरमध्ये एका युवकाने पूर्व प्रेयसीच्या लग्नामुळे निराश होऊन स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. अनिल प्रजापती (२४), गौतम बुद्ध नगरचा रहिवासी, आपल्या गाडीतून बँक्वेट हॉलजवळ पोहोचला, जिथे त्याची पूर्व प्रेयसीचे लग्न होत होते.

तिथेच गाडीबाहेर अनिलने स्वतःवर पेट्रोल ओतून आग लावून आत्महत्या केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे, अनिल आणि त्याचा लहान भाऊ सोविंद्र यांचेही १४ फेब्रुवारीला लग्न होणार होते. गाझीपूर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी अनिलची वॅगनआर कार ताब्यात घेतली असून, कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. अनिल कुमार आपल्या कुटुंबासह गौतम बुद्ध नगर येथील नवादा गावात राहत होता. त्याच्या कुटुंबात वडील प्रमोद कुमार, आई, मोठा भाऊ सुमित आणि धाकटा भाऊ सोविंद्र यांचा समावेश आहे.

अनिल एका कंपनीत कामाला होता. अनिल कुमार आपल्या कुटुंबासह गौतम बुद्ध नगर येथील नवादा गावात राहत होता. त्याच्या कुटुंबात वडील प्रमोद कुमार, आई, मोठा भाऊ सुमित आणि धाकटा भाऊ सोविंद्र यांचा समावेश आहे. अनिल एका कंपनीत कामाला होता.

जिल्हा पोलिस उपायुक्त अभिषेक धानिया यांनी सांगितले की, शनिवारी रात्री ११:३० वाजता गाझीपूरमधील बँक्वेट हॉलजवळ एका युवकाने स्वतःला जाळल्याची माहिती मिळाली. लोकांनी गाडीच्या काचा फोडून त्याला बाहेर काढले, पण तोपर्यंत तो गंभीर भाजला होता.

त्याला एलबीएस रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिस तपासात अनिलचे एका मुलीवर प्रेम असल्याचे समोर आले, मात्र तिचे लग्न दुसरीकडे ठरवण्यात आले होते. अनिलच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button