---Advertisement---

Nashik : सर्वात मोठी ब्रेकींग! कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिलं, स्कूटरवर बसून पळाला, नंतर…

---Advertisement---

Nashik : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले असले तरी अद्याप त्याचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र, आता नाशिकच्या सहदेवनगर परिसरातील आनंद हाइट्सजवळ एका मंदिराजवळ तो दिसल्याचा दावा वकील गितेश तानाजीराव बनकर यांनी केला आहे.

बनकर यांच्या मते, मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ते दत्त मंदिराजवळ असताना त्यांना दोन व्यक्ती दिसल्या. त्यापैकी एकाने मास्क खाली करताच त्याचा चेहरा स्पष्ट झाला आणि तो कृष्णा आंधळेच असल्याचे बनकर यांनी ओळखले. लगेचच त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर दोघे मखमलाबादच्या दिशेने निघून गेले.

बनकर यांनी याबाबत खात्री व्यक्त केली आहे. “मी गेल्या १८ वर्षांपासून नाशिक आणि मुंबईतील क्रिमिनल कोर्टात प्रॅक्टिस करत आहे. गुन्हेगारांना ओळखण्याचा अनुभव असल्याने तो नक्कीच कृष्णा आंधळे होता,” असे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही नाशिकमध्ये कृष्णा आंधळे आल्याची चर्चा होती, मात्र ती अफवा ठरली होती. आता मात्र बनकर यांच्या दाव्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळेवर गंभीर गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी सुदर्शन घुलेसह त्याच्या एका साथीदाराला पुण्यातून अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींवर आरोपपत्र दाखल झाले असले तरी आंधळे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे.

दरम्यान, काही राजकीय नेत्यांनी कृष्णा आंधळेचा खून झाला असावा, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, अधिकृत माहिती हाती आलेली नाही. आता नाशिक पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले असून, बनकर यांच्या दाव्यानंतर या प्रकरणाला नव्याने कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---