Champions Trophy : चॅम्पीयन्स ट्राॅफीच्या फायनलसाठी भारतीय संघात मॅचविनरची एंट्री, रोहित शर्माची मोठी चिंता मिटली

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका मॅचविनर खेळाडूची संघात एंट्री होणार असल्याने कर्णधार रोहित शर्माची चिंता काहीशी मिटली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्व सामने जिंकत शानदार कामगिरी केली आहे. मात्र, काही चुका त्यांच्याकडून झाल्या असून, फायनलपूर्वी त्या सुधारण्याची गरज आहे.

संघात कोणाचा समावेश होणार?

भारतीय संघाच्या फलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, सुरुवातीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल काहीसे धीमे वाटले असले तरी ते कधीही फॉर्मात येऊ शकतात. तसेच, विराट कोहली आपल्या उत्कृष्ट लयीत आहे आणि श्रेयस अय्यर, अक्षर पटेलही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. के.एल. राहुलला सुरुवातीला संघर्ष करावा लागला असला तरी सेमी फायनलमध्ये त्याने दमदार खेळी केली. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनीही आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.

मात्र, भारतीय संघाला मधल्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवता आलेला नाही. हा वेग वाढल्यास भारत 300 धावांचा टप्पा सहज पार करू शकतो किंवा मोठ्या आव्हानाचा पाठलाग करू शकतो. याच कारणामुळे ऋषभ पंतला संघात संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे.

कोणाला मिळणार डच्चू?

जर ऋषभ पंतला अंतिम संघात स्थान द्यायचं झालं, तर कोणाला वगळायचं हा मोठा प्रश्न रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यासमोर आहे. त्यांच्या निर्णयावर अंतिम संघाची रचना अवलंबून असेल.

भारतीय संघ देणार का सरप्राइज?

भारतीय संघात हा बदल झाला, तर त्यांच्या धावगतीत मोठी सुधारणा होऊ शकते. त्यामुळे फायनलसाठी भारत हा आश्चर्यकारक बदल करणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.