Ravindra Jadeja : भारताच्या दणदणीत विजयानंतर रवींद्र जडेजाचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘त्या’ गोष्टीची खंत मला होती पण..

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाने अखेर १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडला ४ विकेट्सनी पराभूत करत भारताने २५ वर्षांपूर्वीच्या पराभवाची जखमही भरून काढली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी २०२४ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा हा टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

न्यूझीलंडची दमदार फलंदाजी, भारतीय गोलंदाजांचा प्रभाव

फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने ७ बाद २५१ धावा केल्या. डॅरील मिचेल (६३) आणि मिचेल ब्रेसवेल (५३) यांनी अर्धशतकं झळकावली, तर रचिन रवींद्र (३७) व ग्लेन फिलिप्स (३४) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय गोलंदाजांपैकी वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

रोहित-गिलची सुरुवात, श्रेयस-अक्षरचा संयम, राहुल-पांड्याचा शेवटचा ठोसा

भारतीय संघाच्या डावाची सुरुवात दमदार झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १०५ धावांची भागीदारी करत विजयाचा मजबूत पाया रचला. रोहितने ८३ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. मात्र, गिल (३१) आणि विराट कोहली (१) लवकर बाद झाल्याने भारतीय संघावर दडपण आले.

श्रेयस अय्यर (४८) आणि अक्षर पटेल (२९) यांनी संघ सावरला, पण त्यांच्या विकेट्स पडल्याने प्रशिक्षक गौतम गंभीर थोडे नाराज दिसले. अखेर, लोकेश राहुल (३४*) आणि हार्दिक पांड्या (१८) यांनी शेवटपर्यंत टिकून राहून भारताचा विजय निश्चित केला. भारताने ६ बाद २५४ धावा करत ऐतिहासिक विजय साजरा केला.

भारताला मोठी बक्षीस रक्कम

आयसीसीने २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण ६०.०६ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती, जी २०१७च्या तुलनेत ५३% जास्त होती. भारताने गट फेरीत तीनही सामने जिंकून ८८ लाख रुपये कमावले, तर न्यूझीलंडला दोन विजयांमुळे ५९ लाख रुपये मिळाले.

विजेतेपदाबरोबरच भारताला १९.४९ कोटींचे बक्षीस मिळाले, तर उपविजेता न्यूझीलंडला ९.७४ कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे एकूण मिळकत पाहता भारताने सुमारे २१.४ कोटी रुपये कमावले, तर न्यूझीलंडच्या खात्यात ११.४ कोटी रुपये जमा झाले.

या शानदार विजयासह भारताने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.