ताज्या बातम्याक्राईम

Saif Ali Khan : करिनाच्या ‘त्या’ चुकीमुळेच हल्लेखोर पळून जाऊ शकला! पोलिसांचा खुलासा; म्हणाले, ‘हल्ल्यानंतर तिने…’

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या मध्यरात्री चाकू हल्ला झाल्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने मुंबई पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याला संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. सैफच्या घरात शिरलेल्या शरीफुल इस्लाम सज्जद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर या व्यक्तीने चाकूने हल्ला केला.

करीना कपूरने या घटनेची माहिती एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून दिली, मात्र त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही. सैफला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतरच पोलिसांना हल्ल्याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तपासासाठी रुग्णालय तसेच सैफच्या घराकडे प्रयाण केले.

पोलिसांच्या मते, करीना कपूरने केलेल्या एका चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. जर करिनाने थेट पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता, तर परिस्थिती लवकर हाताळली गेली असती.

सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ‘सदगुरू शरण’ इमारतीत आरोपीने शिड्या आणि पाईपचा वापर करून दहाव्या आणि अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचत हल्ला केला. आवाज होऊ नये म्हणून त्याने बूट बॅगमध्ये ठेवले होते आणि पळताना कपडे बदलून स्वतःचा फोन बंद ठेवला होता.

तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवरून त्याच्या सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशय व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचे रिक्रिएशन केले आणि तपासासाठी अधिक माहिती उघड करण्याचा प्रयत्न केला. फेस रेकग्नायजेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढून अखेर त्याला अटक केली.

Related Articles

Back to top button