---Advertisement---

Aurangzeb’s treasure : बुऱ्हाणपूर थरार! छावा पाहून लोकं घेत आहेत औरंजगेबाच्या खजिन्याचा शोध, मध्यरात्री खणली शेतं

---Advertisement---

Aurangzeb’s treasure : मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरच्या असीरगड किल्ल्यात सध्या अनोखी चळवळ दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारात टोपीवर टॉर्च लावून, हातात खुरपे-फावडे घेऊन लोक जमीन खोदताना दिसत आहेत. काहीजण चाळणीतून माती गाळत आहेत, तर काहीजण मेटल डिटेक्टरच्या मदतीने शोध घेत आहेत. या रहस्यमय शोधामागचं कारण आहे – सोन्याच्या नाण्यांचा अफवा!

चित्रपटामुळे वाढलेली उत्सुकता
अभिनेता विक्की कौशलच्या छावा या चित्रपटाने या अफवेला अधिक बळ दिलं आहे. चित्रपटात मुघलांनी मराठ्यांकडून सोन्याचा खजिना लुटून तो बुऱ्हाणपूरच्या असीरगड किल्ल्यात लपवला, असं दाखवण्यात आलं आहे. या गोष्टीचा प्रभाव इतका जबरदस्त पडला आहे की स्थानिक लोकांनी रात्रीच्या वेळी जमिनीत खड्डे खोदायला सुरुवात केली आहे.

सुरुवात कशी झाली?
या शोध मोहिमेची सुरुवात केवळ छावा चित्रपटामुळे झालेली नाही. काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या बांधकामादरम्यान शेतात सोन्याची नाणी सापडल्याची चर्चा पसरली होती. स्थानिक नागरिकांच्या मते, या भागात पूर्वी मुघल सैनिकांनी युद्धात मिळवलेला खजिना पुरला होता. या अफवेमुळे आसपासच्या 50 हून अधिक गावांमधील लोक किल्ल्याच्या परिसरात पोहोचले आणि खड्डे खणू लागले.

इतिहासात काही तथ्य?
इतिहासतज्ज्ञांच्या मते, बुऱ्हाणपूर हे मुघल सैनिकांचं महत्त्वाचं ठाणं होतं. येथेच मुघलांनी सोन्याची टाकसाळ उभारली होती, त्यामुळे जुन्या नाण्यांच्या अस्तित्वाला नाकारता येत नाही. काही लोकांना यापूर्वीही जमिनीतून नाणी मिळाल्याचं सांगितलं जातं.

संपत्ती की अंधश्रद्धा?
सध्या सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काहीजण या घटनेला अंधश्रद्धा म्हणत आहेत, तर काहींना खऱ्या इतिहासाचा शोध वाटतोय. भूतकाळातील रहस्यांमुळे वर्तमानात अफवांचा बाजार गरम झालाय हे मात्र नक्की!

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---