---Advertisement---

Delhi : दिल्ली मोहीमेनंतर ‘शिंदे पॅटर्न’ पुन्हा चर्चेत; भाजपने हाती घेतलं नवं मिशन, कोणाला टेन्शन?

---Advertisement---

Delhi : लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतका भरघोस विजय मिळवू न शकलेल्या भारतीय जनता पक्षाने नंतरच्या निवडणुकांमध्ये जोरदार पुनरागमन केले. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील दमदार विजयाने भाजपने हॅट्ट्रिक साधली आहे. सध्या देशातील 19 राज्यांमध्ये एनडीएची सत्ता असून, आता बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

बिहारमध्ये आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील यशानंतर भाजप अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) युती असून, भाजपने 225 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत.

भाजपचा वाढता प्रभाव आणि जेडीयूची अस्वस्थता

दिल्लीतील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असला, तरी याचा ताण जेडीयूवर येण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केले होते. मात्र, यावेळी भाजप कोणताही शब्द देण्यास तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेतला जाईल. यामुळे जेडीयू गोंधळात सापडले आहे.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या, तर जेडीयूला 43 जागांवर समाधान मानावे लागले होते. तरीही, भाजपने दिलेला शब्द पाळत नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले होते. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे.

“शिंदे पॅटर्न” बिहारमध्ये?

2022 मध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड उभे करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सुरुवातीला कमी आमदार असूनही त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले, मात्र नंतर भाजपने पुन्हा नियंत्रण घेतले. याच “शिंदे पॅटर्न”च्या पुनरावृत्तीची भीती आता जेडीयूला वाटू लागली आहे.

भाजपने दिल्ली जिंकल्यानंतर बिहारमधील जागावाटपात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसेच, भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही हमी देण्यास तयार नाही. त्यामुळे, दिल्ली जिंकल्यानंतर भाजप बिहारमध्येही नवा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---