Shirish Maharaj : शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख ‘या’ नेत्याने झटक्यात फेडले!

Shirish Maharaj : संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. 5 फेब्रुवारीला देहू येथील आपल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी डोक्यावर असलेल्या 32 लाखांच्या कर्जाचा उल्लेख केला होता.
ही बातमी समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी शिरीष महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाची जबाबदारी स्वीकारत 32 लाख रुपयांची मदत केली. आमदार विजय शिवतारे यांनी ही मदत कुटुंबीयांना सुपूर्द केली.
व्यवसायातील अडचणींमुळे कर्जाचा डोंगर
शिरीष महाराज मोरे यांनी समाजसेवा आणि कीर्तनाच्या माध्यमातून अनेक वर्षे सेवा केली. मात्र, कोरोनापूर्वी त्यांनी कागदी पिशवी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी “नादब्रह्म ईडली” या ब्रँडची फ्रेंचायजी घेतली आणि हॉटेल व्यवसायात प्रवेश केला. यासाठीही त्यांनी कर्ज घेतले होते. शिवाय, नव्याने घर बांधणे आणि चारचाकी गाडी घेण्यासाठीही कर्ज वाढत गेले.
समाजाने साथ दिली असती?
शिरीष महाराज मोरे यांचे संपूर्ण आयुष्य मोफत कीर्तनसेवा देण्यात गेले. त्यांनी आपल्या चिठ्ठीत कर्ज फेडण्याची जबाबदारी कुणावरही टाकू नये, असे लिहिले होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना हळहळ वाटते की, त्यांनी मदतीसाठी हात पुढे केला असता, तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता
या प्रकरणाचा पुढील तपासड पोलीस करत आहेत.