ताज्या बातम्या

AIDS : मुलगी एड्सने गेल्याचं खोटं पसरवलं, गावाने अख्ख्या कुटुंबालाच वाळीत टाकलं, बीडमध्ये भयंकर प्रकार

AIDS : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे एक कुटुंब अत्यंत मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे गेले आहे. पीडित कुटुंबाने दावा केला आहे की, त्यांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण एचआयव्ही असल्याची खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली, ज्यामुळे कुटुंबाची समाजात अपकीर्ती झाली आहे.

या अफवेने कुटुंबाचे जीवन नष्ट झाल्याचे सांगितले आहे. कुटुंबाने सांगितले की, त्यांच्या मुलीला एचआयव्ही आहे, अशी माहिती पोलीस आणि डॉक्टरांनी गावातील लोकांमध्ये पसरवली, ज्यामुळे लोकांनी त्यांना वाळीत टाकले. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलिस आणि डॉक्टरांनी खोटी माहिती दिली, ज्यामुळे समाजात त्यांना मोठ्या अपकीर्तीला सामोरे जावे लागले.

पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, लोकांनी त्यांच्याशी कोणतीही संबंध ठेवले नाहीत आणि त्यांना नाकारले आहे. ‘आमच्या जवळचे देखील आम्हाला भेटायला आले नाहीत. आजाराच्या अफवेमुळे घरातील इतर सदस्य देखील आम्हाला जवळ येऊ देत नाहीत,’ अशी तक्रार त्यांनी केली.

पीडित कुटुंबाने या प्रकरणावरून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, पोलिस आणि आरोग्य विभागाने खोटे अहवाल दिल्यामुळे त्यांना समाजातील वाईट वागणूक आणि बदनामीला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी या बाबतीत न्यायाची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button