---Advertisement---

Valmik Karad : धक्कादायक! चक्क वाल्मिक कराडकडेच मागितली १५ लाखांची खंडणी; घाबरुन पैसेही दिले, FIR समोर

---Advertisement---

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडमधील आवादा कंपनीकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्यामुळे झालेल्या वादातून देशमुख यांची हत्या झाली. मात्र, कराडलाच एका व्यक्तीनं १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वाल्मिक कराडलाच खंडणीची धमकी

कराडने आवादा कंपनीकडून २ कोटींची खंडणी मागितली होती. मात्र, आता कराडलाच शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीनं अंगावर गाडी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. कराडकडून १५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलं असून, या संदर्भातील तक्रार गणेश उगले यांनी पोलिसांत दाखल केली. उगले हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जन्ममित्र कंपनीत कार्यरत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमधून पुरावे उघड

कराडने १५ लाख रुपयांची रक्कम जन्ममित्र कंपनीच्या लॉकरमधून दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम मिळाल्यानंतरही बांगरकडून कराडला धमक्या मिळत होत्या. गणेश उगले यांनी २ जानेवारी २०२४ रोजी या प्रकरणी पोलिसांत एफआयआर नोंदवला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा संशय

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर मोठा संशय व्यक्त केला आहे. “कराडसारख्या गुन्हेगाराला कोणी धमकी देईल, हे पटण्यासारखं नाही. कदाचित कराडनेच कोणाला अडकवण्यासाठी हा एफआयआर करून ठेवला असावा,” असा दावा त्यांनी केला.

“१५ लाखांची रक्कम जन्ममित्रच्या तिजोरीतून काढण्यात आली, हे खरे आहे. पण ही बाब अधिक संशयास्पद वाटते. कराडने अशा प्रकारच्या आणखी किती खोट्या एफआयआर नोंदवल्या, हे शोधून काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे,” असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.

कराडच्या गुन्हेगारी जगतात नवीन वळण?

या संपूर्ण प्रकरणामुळे कराडच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये नव्या रहस्यांची भर पडली आहे. कराडच्या दहशतीची चर्चा असतानाच, त्यालाच धमकी मिळाल्याच्या प्रकारामुळे बीडसह संपूर्ण राज्यभरात यावर चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---