ताज्या बातम्याक्राईम

Kanpur : नवऱ्याच्या छाताडावर बसून गळा दाबला, नंतर सेक्स पॉवर गोळ्या घेतल्या अन्…; बायकोच्या कृत्याने पोलीसही हादरले

Kanpur : कानपूरच्या बिठूर भागात झालेल्या आबिद अली हत्याकांडाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. आपल्या 20 वर्षांनी लहान प्रियकर रेहानसाठी शबाना यांनी पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. शबानाने आबिदच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबला, तर रेहान आणि त्याचा मित्र विकास यांनी आबिदचे हात-पाय पकडून ठेवले होते. हत्येनंतर आबिदच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूल ठेवून मृत्यू ओव्हरडोसमुळे झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालाने हा बनाव उघडकीस आणला.

पोलिस तपासाने केला खुलासा

19 जानेवारीला आबिद अली यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला होता. त्यावेळी शबानाने रडत शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला. मात्र शवविच्छेदन अहवालात आबिदचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान शबानाने रेहानशी केलेल्या वारंवार कॉल्सचा तपशील उघड झाला. पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सोशल मीडियाने सुरू झाली प्रेमकहाणी

शबानाने सोशल मीडियावर आपले तरुणपणातील फोटो लावल्यामुळे रेहान तिच्या संपर्कात आला. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले. शबाना आणि रेहानने अनेक वेळा भेटी घेतल्या. पतीचा अडथळा दूर करण्यासाठी शबानाने रेहानला 20 हजार रुपये दिले आणि हत्येची योजना आखली.

हत्या करण्याची पद्धत आणि बनाव

हत्या करण्यापूर्वी शबानाने पतीकडून शक्तिवर्धक कॅप्सूल मागवल्या होत्या. 19 जानेवारीच्या रात्री रेहान आणि त्याचा मित्र विकास यांच्या मदतीने शबानाने पतीची हत्या केली. त्यानंतर कॅप्सूलचा बनाव रचला. सकाळी तिने गोंधळ घालून पतीने कॅप्सूल घेतल्याने मृत्यू झाल्याचे भासवले.

अटक आणि गुन्ह्याची कबुली

पोलीस तपासानंतर शबाना आणि रेहानला गुरुवारी अटक करण्यात आली. विकासलाही शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. विकासने हत्येसाठी रेहानकडून 10 हजार रुपये घेतल्याचे कबूल केले आहे.

पुढील कारवाई

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शबानाने पैशांच्या हव्यास आणि प्रियकरासाठी पतीची हत्या केल्यामुळे या घटनेने कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button