IREDA : अजून काय पाहीजे? १५ दिवसांत डबल झाला पैसा; आताच बाजारात आलेल्या शेअरचा तुफान परतावा

सरकारी कंपनी इरेडा-आयआरईडीए (IREDA) च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून कंपनीचे शेअर्स शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात १४ टक्क्यांहून अधिक वाढून ७३.६७ रुपयांवर पोहोचले.

इरेडाच्या शेअर्सने शुक्रवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला असून गुरुवारी सरकारी कंपनीचे शेअर्स ६४.२० रुपयांवर बंद झाले. तर इरेडाचा आयपीओ १५ दिवसांपूर्वी ३२ रुपयांवर बाजारात सूचिबद्ध झाला होता आणि आता कंपनीच्या शेअर्सने १५ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

इरेडा (IREDA) चा आयपीओ २१ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आला आणि २३ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. कंपनीचा आयपीओ ३०-३२ रुपयांच्या प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला असून आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स ३२ रुपयांना वाटप करण्यात आले.

तसेच कंपनीचे शेअर्स २९ नोव्हेंबर २०२३ रोजी ५० रुपयांवर सूचीबद्ध झाले असून आता शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारी कंपनीचे शेअर्स ७३.६७ रुपयांवर पोहोचले आहेत. अशाप्रकारे गेल्या १५ दिवसांत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना १००% पेक्षा जास्त परतावा दिला.

सरकारी कंपनी इरेडाचा आयपीओ एकूण ३८.८० पट सबस्क्राइब झाला असून कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी ७.७३ पट भाग सबस्क्राइब केला. तसेच गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भाग (NII) २४.१६ पट सबस्क्राइब झाला आहे.

पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा भाग १०४.५७ पट सबस्क्राइब झाला असताना कंपनीच्या आयपीओमधील कर्मचाऱ्यांचा कोटा ९.८० पट सबस्क्राइब झाला. सरकारी कंपनी इरेडाच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बेट लावू शकत होते.

कंपनीच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये ४६० शेअर्स होते. रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स तुम्हाला दीर्घकाळ श्रीमंत बनवू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे असून अनेकांनी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यास IREDA चे शेअर्स कमकुवत झाल्यावर खरेदीचा सल्ला दिला आहे.

इरेडा शेअर्समध्ये पुढेही बरीच तेजी दिसण्याची बर्‍याच बाजार तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. तर नवीकरणीय आणि हरित ऊर्जेची किंमत खूपच कमी आहे, त्यामुळे IREDA कंपनी म्हणून खूप चांगली कामगिरी करेल, असे तज्ज्ञांनी म्हटले. शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत की जेव्हा जेव्हा IREDA चे शेअर्स कमकुवत होतात तेव्हा तुम्ही ते विकत घ्यावेत.

याशिवाय आयपीओ अंतर्गत शेअर्सचे वाटप करण्यात आले आहेत त्यांनी दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर्स राखून ठेवावेत, असेही तज्ञ सुचवत आहेत. तर भविष्यात मोठी कमाई करण्यासाठी गुंतवणूकदारांनी घसरलेल्या किमती दरम्यान शेअर्स खरेदी करण्याचा विचार करावा असे विश्लेषक सुचवतात.