Kolhapur Accident : कोल्हापूरात मद्यधुंद कारचालक सुसाट, ९ वाहनांना धडक, मोपेड २० फूट हवेत, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू..

Kolhapur Accident : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहे. अपघातानंतर संतप्त लोकांनी मद्यधुंद अवस्थेतील चालकाला बेदम चोप दिला. कसबा बावडा ते सीपीआर चौककडे जाणाऱ्या रोडवर महावीर कॉलेज समोर ही घडली आहे.

याबाबत चालक ऋषिकेश बाबुराव कोतेकर हा मद्यपान करून कसबा बावडाकडून सीपीआर रुग्णालयाच्या दिशेने येत होता. तो मोठ्या प्रमाणात नशेत असल्याने भरधाव वेगाने येत रमणमळा ते मेरी वेदर मैदान दरम्यान दोन दुचाकींना धडक दिली.

पुढे त्याने गाडी न थांबवता आणखी वेगाने तो महावीर कॉलेज चौकात आला. याचवेळी बॅडमिंटन खेळून वरुण रवी कोरडे हा खेळाडू हिरो प्लेझर मोपेडवरून घरी जात होता. यावेळी चौकात कारने त्याला जोराची धडक दिली.

या धडकेत वरुणची मोपेड वीस फूट उंच हवेत उडून पडली आणि वरूण रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्यावर चारचाकीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.