Loksabha 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, लोकसभेत शिंदे पवारांना ‘इतक्या’ जागा मिळणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या राजकीय पक्षांची सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत असणार आहे. त्यांचे जागा वाटप अद्याप स्पष्ट झाले नाही. महायुतीचे जागा वाटप सध्या पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेत्यांच्या उपस्थित बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.

यामध्ये भाजपला ३४ जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १० जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना यामध्ये कमी जागा दिल्या आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवल्या होत्या, आता ते ९ जागा जास्त लढवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे त्यांच्यासोबत १३ खासदार आहेत. त्यांच्याही जागा कमी केल्या जाणार आहेत, अशी माहिती आहे.

अजित पवार यांच्यासोबत एकच खासदार आहे, त्यांना चार जागा मिळणार आहेत. यामध्ये बारामती, शिरुर आणि रायगड या जागांचा समावेश आहे. या जागेशिवाय अजित पवारांना कोणती जागा मिळणार हे पाहावे लागेल. यामुळे अजित पवार यांना सर्वात कमी जागा मिळणार आहेत.

दरम्यान, भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपनं पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आता पुढील यादीत कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.