World Cup 2023 : ‘हा तर सपशेल मुर्खपणा!’ विक्रमी शतकानंतर मॅक्सवेल BCCI वर भडकला म्हणाला, ‘मी तर डोळे झाकून…’

World Cup 2023 : नावाप्रमाणेच या शानदार फलंदाजाचा ‘बिग शो’ वर्ल्ड कप 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला. 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने शानदार शतक झळकावले.

मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक झळकावले आणि संघाला मोठा विजय तर मिळवून दिलाच पण अनेक मोठे विक्रमही मोडीत काढले. मात्र सामना संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर अचानक मॅक्सवेलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या एका निर्णयावर संताप व्यक्त केला.

अगदी कठोर शब्दांमध्ये त्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खेळीनंतरही अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या लाइट शोबाबत मॅक्सवेल चांगलाच संतप्त दिसला. यानंतर डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

वास्तविक, विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लाईट शो आयोजित केला जातो. नेदरलँड-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियमवरही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण मॅक्सवेलला हे आवडले नाही आणि त्याने नाराजी व्यक्त करत म्हटले.

“ही रोषणाई पाहून माझं डोकं दुखू लागलं. माझ्या डोळ्यांना आजूबाजूचं परत सामान्यपणे पूर्वीसारखं दिसण्यासाठी काही वेळ लागला. क्रिकेटपटूंच्या दृष्टीने विचार केला तर ही सर्वात बावळटपणाची कल्पना आहे, असं मला वाटतं,” असं स्पष्ट मत मॅक्सवेलने व्यक्त केलं आहे.

“या रोषणाईचा त्रास होत असल्याने मी डोळे बंद करुन घेतले होते आणि त्या रोषणाईकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हे फारच भयंकर होतं. फारच भयंकर कल्पना आहे की. चाहत्यांची उत्तम आहे मात्र खेळाडूंसाठी तितकीच भायानक आहे,” असं मॅक्सवेलने स्पष्टपणे सांगितलं.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मॅक्सवेल 41व्या षटकात फलंदाजीला आला. साधारणपणे, यानंतर पचाशा लावणे देखील प्रशंसनीय मानले जाते. तो येताच मॅक्सवेलने फटके खेळायला सुरुवात केली आणि नंतर वेग वाढत गेला. अवघ्या 40 चेंडूत शतक केले.

मॅक्सवेल 50 व्या षटकात बाद झाला. त्याने 44 चेंडूत 106 धावांची खेळी खेळली. या खेळीत नऊ चौकार आणि आठ लांब षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावून एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले आहे.

मॅक्सवेलने एडन मार्करामचा विक्रम मोडला. मार्करामने ७ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध ४९ चेंडूत शतक झळकावून हा विक्रम केला होता. मॅक्सवेलने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात 52 चेंडूत शतक झळकावले होते.