मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार? शिखर धवनने केला मोठा खुलासा, सगळंच सांगून टाकलं…

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनबद्दल एक जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे त्याच्या लग्नाबद्दल. अशातच आता त्याने एका मोठा खुलासा केला आहे. यामुळे याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.

आयपीएल २०२४ च्या हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला लागली. सध्या क्रिकेटपासून दूर असलेला शिखर धवन त्याच्या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये धवनने स्वतःशी संबंधित एका अफवेबद्दल खुलासा केला.

कर्णधार शिखर धवनने सांगितले की, त्याने एकदा एक अफवा एकली होती की, तो भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत लग्न करत आहे. धवनने सांगितले की, ही त्याच्याबद्दलची एक विचित्र अफवा होती.

दरम्यान, महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू मिताली राज हिने निवृत्तीनंतर समालोचन आणि मेंटरशिपमध्ये दुसरी इनिंग सुरू केली आहे. मिताली राज महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आहे. तिचे अनेक चाहते आहेत. यामुळे तिची देखील नेहेमी चर्चा होत असते.

धवनने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत याचेही कौतुक केले, ज्याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात शानदार पुनरागमन केले आहे. धवन म्हणाला, अपघातानंतर ऋषभ पंतने ज्या प्रकारे पुनरागमन केले आणि दुखापतींना हाताळले त्याचे मला कौतुक करायचे आहे.

त्याने दाखवलेली सकारात्मकता आणि ताकद अप्रतिम आहे. तो परत आला, आयपीएल खेळला आणि भारतीय संघात सामील झाला हे अविश्वसनीय आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे, असं शिखर धवनने सांगितले आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील सतत चर्चेत राहिला आहे.

शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यावर बरीच चर्चा झाली. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला. नऊ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आता ती दुसरे लग्न करणार की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.