Moo Abraham : 1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स, 3 कोटींची कार; 11 वर्षीय चिमुकलीचा रूबाब पाहून नेटकरी हैराण; पहा PHOTO

Moo Abraham : जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत, ज्यांची संपत्ती पाहून लोकांना वाटते की, त्यांच्याकडेही इतके पैसे असायला पाहिजे. ज्यांच्याकडे पैसा आहे, लक्षाधीश आणि अब्जाधीश आहेत, ते लोक तो वेगवेगळ्या प्रकारे कसा खर्च करतात हे तुम्ही पाहिलेच असेल.

कधी महागड्या कार, कधी दागिने तर कधी इतर काही महागड्या वस्तू खरेदी करतात. या श्रीमंत लोकांची मुलेही भरपूर पैसे खर्च करताना दिसतात. ते महागड्या कारमधून प्रवास करतात, डिझायनर कपडे घालतात, महागड्या बॅग आणि पर्स ठेवतात.

आजकाल, अशीच एक मुलगी चर्चेत आहे, जी केवळ 10 वर्षांची आहे आणि इतके समृद्ध जीवन जगते की लोक तिच्याकडे टक लावून पाहत राहतात. मू अब्राहम असे या मुलीचे नाव आहे. ती खूप विलासी जीवन जगते. तिच्याकडे अनेक महागड्या वस्तू आहेत.

मिररच्या रिपोर्टनुसार, मू अब्राहम सुमारे 3 कोटी रुपयांच्या कारमधून प्रवास करते. एवढेच नाही तर तिच्याजवळ २० लाख रुपये किमतीची पर्सही आहे. क्वचितच असा कोणताही लक्झरी ब्रँड असेल ज्याची उत्पादने तिने वापरली नसतील.

Gucci आणि Louis Vuitton सारखे महागडे ब्रँड त्याच्यासाठी आता कॉमन झाले आहेत. ती डिझायनर कपडे सोडून कोणतेही कपडे घालत नाही. लोक मू अब्राहमला ‘द बिलियनेअर्स डॉटर’ असेही म्हणतात.

रिपोर्ट्सनुसार, टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती 61 लाख रुपये किमतीचा ड्रेस, 4 लाख रुपये किमतीचा हार आणि 11 लाख रुपये किमतीची पर्स घेऊन जाताना दिसत होती.

तथापि, मू अब्राहमच्या आईचे म्हणणे आहे की ती पैशाची उधळपट्टी करत नाही, तर आपले जीवन विलासी शैलीत जगते. आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या लहान मुलीकडे इतका पैसा कुठून आला की ती इतकी श्रीमंती जगते, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तिचे आई-वडील खूप श्रीमंत आहेत.

अॅडम आणि एमिली अब्राहम अशी त्यांची नावे आहेत. लंडनमध्ये त्यांची अनेक दुकाने आहेत, जिथे केवळ लक्झरी वस्तू विकल्या जातात. हे कुटुंब स्वत:ला अब्जाधीश म्हणवत असले तरी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, हे समोर आलेले नाही.