खासदार निलेश लंकेंनी घेतली ‘या’ कुख्यात गॅंगस्टरची भेट, राजकीय वर्तूळात खळबळ

नुकतेच सगळ्यांना धक्का देत अहमदनगर लोकसभेला निवडून आलेले खासदार निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता एका प्रकरणामुळे वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे.

याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे. यामुळे आता विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते.

दरम्यान, खासदार निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे.

दरम्यान, गजानन मारणे हा एक गुंड असून अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याचे मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती.

या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे. अनेकदा यातून पुण्यात गँगवार होत असतात. यामुळे या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.