Nanded News : नांदेड जिल्हा रुग्णालयात अतिशय भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
यामध्ये 12 नवजात बाळांचा समावेश होता. मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. या रुग्णालयातील मृतकांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असे असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामध्ये याठिकाणी असलेल्या महिलेला लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी बाळ झाले होते. असे असताना मात्र पण या रुग्णालयाने बाईचे आईपणच हिरावून घेतले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. यामुळे या महिलेला अश्रू अनावर झाले. खासदार सुप्रिया ताई जेव्हा तिच्याजवळ आल्या तेव्हा तिला भावना अनावर झाल्या. तिने टाहो फोडला. मोठा आक्रोश केला.
आपण गरीब आहोत म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. पण जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष करुन आपल्या बाळाचा जीव घेतला, अशी माहिती तिने दिली. 12 वर्षांनी बाळ झालं होतं. माझ्या बाळाचा जीव घेतला. माझ्या बाळावर सर्व दुर्लक्ष केले.
मिडीयासमोर बोलले म्हणून डॉक्टरांनी उपचार नाही केले. तुम्हाला काय करायचं ते करा. असे सांगितले गेले. आमच्याने काय होणार आहे? आम्ही गरीब आहोत ना? आमच्याकडे पैसे नाहीत. ते श्रीमंत आहेत. 12 वर्षांनंतर मला बाळ झालं. त्यांनी जीव घेतला माझ्या बाळाचा, असे म्हणत महिलेने सुप्रिया सुळे यांच्यासमोर हॉस्पिटलची व्यथा मांडली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी अनेक रुग्णांनी आपली व्यथा याठिकाणी मांडली.