Nashik news : डॉक्टर पत्नीचा अपघाती मृत्यू पण पोलिस तपासात भयानक सत्य आले समोर, पतीवरच खुनाचा गुन्हा दाखल…

Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. येथील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात खून झाल्याची घटना घडली आहे. डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय २७ वर्ष, राहणार न्यायडोंगरी) असे त्यांचे नाव आहे.

दगडाने ठेचून हा खून करण्यात आला आहे. तिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्री ही मयत झाल्याचे सांगितल्याने चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली.

१५ दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन साळुंखे याने पोलीस ठाण्यात बहीण भाग्यश्री हिचा खून झाल्याची फिर्याद दाखल केली. यामुळे याबाबत तपास केला गेला. माझी बहीण भाग्यश्री हिच्याकडे पती डॉक्टर किशोर नंदू शेवाळे व तिचे सासरे नंदू राघो शेवाळे हे पैशांची मागणी करत होते.

तू तुझ्या माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत होते. त्यांची मागणी भाग्यश्री हिच्याकडून पूर्ण न झाल्याने आरोपी डॉ किशोर नंदू शेवाळे व त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांनी संगनमताने बहीण डॉक्टर भाग्यश्रीचा दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे सध्या उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मात्र तालुक्यात सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.