‘आता एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’; उद्धव ठाकरेंचा भर सभेत बड्या नेत्याला इशारा

उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ते मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आक्रमक भाषण करत भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तर थेट इशाराच दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी जाहीर इशारा दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध थेट ‘आर या पारची’ भूमिका घेतली आहे.

यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले, असा गौप्यस्फोट देखील ठाकरे यांनी केला.

आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. त्यांनी देशाला वाचवण्याची विनंती केली.

अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन लाचार झाले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठाकरेंना नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.