Pandharpur News : मला विठुराया शिवाय आहे तरी कोण? आज्जींनी शेती विकून विठूरायाला २६ तोळे केले दान..

Pandharpur News : एका महिलेने तब्बल २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विठूरायाच्या चरणी दान केले आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी शेती विकली आहे. धाराशीव जिल्ह्यातील या महिलेने पंढरपुरात विठ्ठल मंदिरात २५.५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा दान केला.

तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. याची एकत्रित किंमत १८ लाख रुपयांच्या घरात जाते. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत मंदिर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, मला माझ्या विठुराया शिवाय आहे तरी कोण? श्रीमती बाई लिंबा वाघे असे या महिला भक्ताचे नाव आहे. यासाठी त्यांनी शेती विकली आहे. यातून आलेल्या पैशांतून त्यांनी देवाला २६ तोळे सोन्याचा करदोडा अर्पण केला.

देवस्थानच्या वतीने श्रीमती बाई लिंबा वाघे यांचा सत्कार करण्यात आला. आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांचे हस्ते साडी उपरणे व श्री विठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा देऊन करण्यात आला. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, विठूरायाच्या चरणी दानधर्म करणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. फक्त राज्यातूनच नव्हे, तर देश-परदेशातून मोठमोठ्या दानाचा ओघ याठिकाणी येत असतो. लाखो भाविक याठिकाणी रोज येत असतात.