---Advertisement---

Parambir Singh : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंहांचा एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने…, NIA कोर्टात सनसनाटी दावा

---Advertisement---

Parambir Singh : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा धक्का देणारा खुलासा झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना हा आदेश तोंडी दिला होता.

मात्र, हा आदेश बेकायदेशीर आणि कोणत्याही लिखित स्वरुपात नसल्यामुळे मुजावर यांनी त्याचे पालन केले नाही. या कारणामुळे त्यांना सोलापूरमधील एक खोट्या प्रकरणात गोवण्यात आले, असे खासगी वकील रणजित सांगळे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सांगितले.

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. यावर चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीमध्ये वकील सांगळे यांनी युक्तिवाद केला की, परमबीर सिंह यांनी मेहबूब मुजावर यांना मोहन भागवत यांना मुंबईत आणण्याचा बेकायदेशीर आदेश दिला होता. मुजावर यांनी हा आदेश तोंडी दिला असून, लिहिताने न दिला, ज्यामुळे त्यांना सोलापूरातील खोट्या प्रकरणात अडकवले गेले.

याव्यतिरिक्त, मुजावर यांनी यापूर्वी मीडिया समोर सांगितले होते की, एटीएसच्या कोठडीत संदीप डांगे आणि रामचंद्र कालसंग्रा यांचा मृत्यू झाला, तरीही त्यांना या प्रकरणात जिवंत दाखवले गेले. वकील सांगळे यांनी असा आरोप केला की, एटीएसला ते दोघे जिवंत पाहिजेत, असे दिसते. या खुलाशामुळे परमबीर सिंह आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील त्यांचा संबंध अधिक स्पष्ट झाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---