मुलीवर बलात्कार केला म्हणून नातेवाईकांनी घेतला बदला, आरोपीला पकडला अन्…; घटनेने उडाली खळबळ

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेला व्यक्ती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत नाही म्हणून पीडित मुलीच्या नातेवाईकांनी चक्क त्याला पकडून विष पाजून त्याचा खून केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील बगेवाडी येथील ही घटना आहे. येथील एका मुलीवर अत्याचार झाला होता. आरोपी पोलिसात हजर होत नव्हता आणि पोलिसांचाही हाती येत नव्हता. यामुळे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी त्याला पकडले आणि त्याला विष पाजले.

दरम्यान, गंगा भोसले याची पत्नी गंगुबाई हिने तलवाडा पोलिसात फिर्याद दिली आहे. गंगा भोसले असे बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, रमेश भाऊराव पवार , कृष्णा चव्हाण , रवी लक्ष्मण शिंदे , आकाश लक्ष्मण शिंदे ( राहणार बगेवाडी ) आणि विष्णू राघू काळे ( राहणार तलवाडा ) अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. दोन जण अजूनपर्यंत ताब्यात आलेले नाहीत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सर्वांना मोठा धक्का बसला. याबाबत काहींनी या घटनेला योग्य न्याय म्हटले आहे.

याबाबत न्यायाची मागणी केली जात होती. यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे ही घटना वाऱ्यासारखी बीड जिल्ह्यात पसरली. याबाबत कुटूंबाचे काही समजायच्या आतची ही घटना घडवून आणली आहे.