सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झालेली आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत. मुंबईला पहिल्या तिनही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे सध्या हार्दिक पंड्या याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबईने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पंड्या याला कर्णधार केले. यामुळे हा एक मोठा बदल होता. यामुळे चाहते नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत मैदानावर हार्दिक पांड्याला ट्रोल केले जात आहे.
मुंबईच्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असताना नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर मात्र रोहित शर्मा चांगलाच संतापला आहे.
रोहित शर्माने ही ऑफर नाकारत सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत माहिती अशी की, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला ऑफर दिल्यानंतर रोहितने यासाठी नकार दिला. तसेच आयपीएलचा हा सीजन संपल्यावर मुंबईकडून खेळणार नसल्याचे नीता अंबानी यांना सांगितले आहे.
यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तो आयपीएल 2025 मध्ये नवीन संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. सोशल मीडियावर संदर्भातील चर्चा आहे. त्याला कोणताही आधार नाही.
दरम्यान, आता पुढील काळात मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच येणाऱ्या काळात टीममध्ये काही बदल होणार का याबाबत देखील शक्यता नाकारता येत नाही. याबाबत लवकरच माहिती समोर येईल.