Rohit Sharma : रोहित शर्माची एक पोस्ट अन् मुंबई इंडियन्सची उडाली झोप, नेमकं काय झालं?

Rohit Sharma : आयपीएलमध्ये सध्या अनेक खेळाडूंची आदलाबदल केली जात आहे. तसेच काही खेळाडू विकत घेतले आहेत. यामध्ये मुंबईतच्या टीममध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. असे असताना रोहित शर्मामुळे सध्या मुंबई इंडियन्सची झोप चांगली उडाली असेल. कारण रोहितच्या एका पोस्टने कमाल केली आहे.

रोहितने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, याबाबत आता तर्कवितर्क चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढले. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुढच्या हंगामासाठी आपले कर्णधार केले आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

रोहितला कर्णधार म्हणून काढल्यावर बऱ्याच चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर सोठचिठ्ठी दिली होती. रोहित नाही तर आम्ही तुमचे चाहते नाही. असे अनेकांनी म्हटले होते. आता मात्र रोहितने एक पोस्ट केली आणि अनेकांची झोप उडाली.

रोहित शर्माने इंस्टाग्रावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहितने आपल्या पत्नीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. रोहितची पत्नी रितिकाचा वाढदिवस होता. त्यामुळे रोहितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. मात्र याची वेगळेच चर्चा रंगली.

असे असताना या पोस्टला फक्त दोन तासांत दोन मिलियन लाइक्स मिळाले आहेत. हे पाहून मुंबई इंडियन्सची नक्कीच झोप उडाली आहे. कर्णधारपदाच्या वादानंतर मुंबई इंडियन्सच्या पोस्टला जास्त प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मात्र रोहितला मोठा प्रतिसाद मिळतोय.

रोहितच्या एका पोस्टला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता चाहते रोहित शर्माच्या पाठिशी उभे असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियामध्ये तरी सध्या तेच दिसत आहे. त्यामुळे संघापेक्षा रोहित शर्माचे चाहते जास्त आहेत. यामुळे रोहितला मोठा पाठिंबा मिळतोय.