Rohit Sharma : भारतीय कर्णधार रोहित शर्माने विश्वचषक 2023 मध्ये सलग नववा विजय नोंदवल्यानंतर सांगितले की, संघाने एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित केले आणि विविध खेळाडूंनी विजयात योगदान दिले.
केएल राहुल (102 धावा, 64 चेंडू) आणि श्रेयस अय्यर (नाबाद 128 धावा, 94 चेंडू) यांच्या शतकी खेळीमुळे भारताने शेवटच्या साखळी सामन्यात चार गडी गमावून 410 धावा केल्या आणि नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. सलग नवव्यांदा विजय संपादन केला.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘टूर्नामेंटच्या सुरुवातीपासून आम्ही एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित केले. स्पर्धेत 11 सामने आहेत त्यामुळे एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे होते. आम्ही कधीच फार पुढचा विचार केला नाही.
आम्ही वेगळ्या स्टेडियममध्ये खेळत होतो त्यामुळे त्यानुसार खेळणे महत्त्वाचे होते आणि आम्ही तेच केले. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थितीत खेळत असल्यामुळे तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं आणि त्यानुसार खेळावं लागतं, हेच आम्ही केलं.
या नऊ सामन्यांमध्ये आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे आम्ही खूप खूश आहोत. संघाच्या नऊ सामन्यांतील कामगिरीवर रोहित खूप खूश होता. तो म्हणाला, ‘पहिल्या सामन्यापासून आजपर्यंत आम्ही उत्कृष्ट खेळलो आहोत.
या सामन्यांमध्ये विविध खेळाडूंनी योगदान दिले. प्रत्येकाला जबाबदारी घ्यायची होती. वेगवेगळ्या ठिकाणी खेळणे हे आव्हान होते पण आम्ही चांगले खेळलो. भारतीय संघाच्या 9 गोलंदाजांनी नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी केली.
यावर कर्णधार रोहित म्हणाला- जेव्हा तुमच्याकडे पाच गोलंदाज असतात तेव्हा तुम्हाला संघात पर्याय निर्माण करायचे असतात. आज आमच्याकडे नऊ पर्याय होते, ते महत्त्वाचे आहे, हे अशा प्रकारचे सामने आहेत जिथे आम्ही काही गोष्टी करून पाहू शकतो.
सीमर्स गरज नसताना वाइड यॉर्कर टाकायचे, पण आम्हाला ते करायचे होते. बॉलिंग युनिट म्हणून, आम्हाला काहीतरी वेगळे करून पाहायचे होते आणि आम्ही काय साध्य करू शकतो ते पाहायचे होते.