सानिया मिर्झाने सोडलं मौन, शोएबच्या दुसऱ्या लग्नाबाबत सगळं खरं खरं सांगितलं….

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. दरम्यान, आता सानियाची टीमनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यासोबत शोएबला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये म्हटलं आहे की सानियानं कायम तिचं आयुष्य हे खासगी ठेवलं आहे. तिनं कधीच त्यावर पब्लिकली चर्चा केली नाही. दरम्यान, आज तिला या सगळ्याची गरज भासली आहे.

ती सांगू इच्छिते की तिचा आणि शोएबचा घटस्फोट होऊन बरेच महिने झाले आहे. ती शोएबला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते. असेही म्हटले आहे. यामुळे आता या चर्चा थांबणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शोएबने शनिवारी सकाळी त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला, शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. याआधी सानिया मिर्झाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती.

ज्यात तिच्या आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या अफवा अधिक वेगाने पसरू लागल्या होत्या. या पोस्टमध्ये ती म्हणाली होती की, घटस्फोट घेणे खूप कठीण आहे आणि लग्न करणे देखील खूप कठीण आहे. यामुळे चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर कदाचित शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला असल्याचे संकेत मिळत होते. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा २०१० मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सानियाला इजहान नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचं बिनसले असल्याची चर्चा आहे.