Satara News : सातारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. येथील हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली.
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची फिर्याद संशयित आरोपी विजय आनंदराव खताळ (वय ३६) यांनी दिली होती. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला कॅन्सर असल्याचा संशय व मृत्यू पश्चात आपल्या मुलाचे कसे होईल यामुळे त्याने दोरीने गळा आवळून मुलाचा खून केला आहे.
याबाबत पोलिसांना त्यांनी माहिती दिली आहे. कॅन्सर असल्याचा संशय आणि आपल्या मृत्यूनंतर मुलाचे कसे होईल या काळजीतून वडिलांनीच हे कृत्य केल्याने याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
मौजे हिवरे गावाच्या हद्दीत कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम विजय खताळ या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञाताने गळा आवळून खून केला असल्याची माहिती वाठार पोलीस ठाण्यात आली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला होता.
दरम्यान, पोलिसांनी पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते. तसेच वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. यामुळे याबाबत तपास सुरू होता.
यावेळी मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीवरून हा गुन्हा त्याच्या वडिलांनी केला असल्याचा संशय निर्माण झाला. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती व इतर साक्षीदारांकडे दिलेली माहिती यात फरक दिसून आली. यानंतर वडिलांनी याबाबत कबुली दिली.