सामन्याआधी सेक्स केल्याने मिळते ऊर्जा? क्रिकेटर्स तेव्हा शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा…

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या विजयात संघाचा असिस्टंट कोच अभिषेक नायरनेही महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक नायरने 2022 मध्ये दिनशे कार्तिकच्या कमबॅकमध्येही मोलाचा वाटा उचलला होता.

आता अभिषेक नायरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत युट्यूबर रणवीर अलाहबादियाने प्रश्न विचारल्यानंतर अभिषेक नायर चकित झाला. खेळाडूंची कामगिरी बिघडते अशी सर्वसाधारण धारणा असल्यामुळे खेळाडूंना लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो, की नाही, हे जाणून घेण्यास तो उत्सुक होता.

एकदा रोनाल्डोला विजयानंतर सेक्स करण्यापेक्षा हे चांगले आहे का? असे विचारण्यात आले होते. त्यावर त्याने मी यापूर्वी अनेकदा सामन्याआधी सेक्स केला आहे. यामुळे तुम्हाला एकाग्रतेसाठी मदत होते. सगळेच प्रशिक्षक तुम्हाला सामन्याआधी सेक्स करण्याची परवानगी देत नाहीत. पण काही सामन्यात मी सेक्स केल्याने चांगली खेळी केली असल्याचे त्याने सांगितले होते.

दरम्यान, अभिषेक नायरला जेव्हा सेक्ससंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने स्पष्टीकरण देत काही खेळाडूंसाठी ते फायद्याचं ठरते, असे सांगितले होते. मात्र काहींना त्याचा फायदा होत नसल्याचे त्याने सांगितले. ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असते, असेही त्याने सांगितले.

क्रिकेटमध्ये सेक्स? खेळाडूंच्या जीवनात हा घटक आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला, तेव्हा नायर म्हणाला की, तू हे सकारात्मक पद्धतीने विचारत आहेस की नकारात्मक पद्धतीने? तू खूप मोकळेपणाने प्रश्न विचारला आहे. कोणता माणूस त्याशिवाय जगू शकतो? पण ते चांगले की वाईट? तो तुमचा प्रश्न आहे का? असे सांगितले.

प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात सतत विचारांचे वादळ सुरु असते. काहींना ते आवडेल, काहीजण ते टाळतील. काही क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की त्यांनी लैंगिक संबंध न ठेवल्यास त्यांची शक्ती आणि लक्ष्य केंद्रीत करने वाढते, असेही त्याने स्पष्ठपणे सांगितले. काहीजण त्याचे अनुसरण करतात आणि शेवटी असा निष्कर्ष काढतात की त्यांच्यासाठी काहीही बदललेले नाही, असेही त्याने सांगितले.