गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदेंच्या एका नगरसेवकाने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या आमदार किशोर पाटलांच्याच मतदार संघात हे घडलं आहे. जळगावमध्ये भाजप मित्रपक्षानेच शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. भडगावचे नगरसेवक लखीचंद पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शेकडो कार्यकर्त्यांनी लखीचंद पाटील यांना यावेळी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तेही त्यांच्यासोबत भाजपमध्ये सामील झाले आहे. तसेच भाजपने अजित पवार गटातील माजी आमदारालाही मोठा धक्का दिला आहे.
भडगाव तालुक्यातील वडजी गावातील राष्ट्रवादीच्या सरचिटणीसानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपने मोठी खेळी खेळत शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला धक्का दिल्याची चर्चा आहे.
किशोर पाटील यांचे समर्थक म्हणून लखीचंद पाटील यांची ओळख होती. पण त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री गिरिश महाजन आणि जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी शेकडो कार्यकर्तेही त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले आहे.
तसेच शिंदे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे सटचिटणीसही भाजपमध्ये दाखल झाले आहे. सरचिटणीस जगदीश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. अजित पवार यांच्या गटातील माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. जगदीश पाटीलांच्या प्रवेशामुळे भडगावमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.