Haryana : धक्कादायक! बहिणीवर ३० वार करुन केली हत्या; त्याअगोदर फेसबुक पोस्ट टाकली, जय बाबा बलाकारी!

Haryana : हरयाणाच्या अंबाला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भावानं चाकूनं गळा कापून त्याच्या बहिणीला संपवलं. त्यानं त्याच्या २८ वर्षीय बहिणीवर चाकूनं ३० वार केले. त्यानंतर तिचा गळा चिरला. त्यानं तिच्या गुप्तांगावरदेखील वार केले.

त्यानंतर आरोपी भाऊ घटनास्थळावरुन फरार झाला. खुनाबद्दल समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

२८ वर्षीय भावनाचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. पण पतीसोबत तिचं पटत नव्हतं. नात्यात कटुता आल्यानं भावना गेल्या ६ महिन्यांपासून अंबालामध्ये आईकडे राहत होती. तिची घटस्फोटाची केस सुरू होती. सोमवारी सकाळीच तिनं घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.

त्यावरुन तिचा भावासोबत वाद झाला. यानंतर भावानं तिची निर्घृणपणे हत्या केली. भावनाला संपवण्याआधी आरोपी भावानं फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं बहिणीला संपवण्याचा उल्लेख केला होता.

मला नाईलाजास्वत हे पाऊल उचलावं लागत असल्याचं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. बहिणीचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीची मदत मागितली. बहिणीच्या सासरच्या लोकांच्या वरपर्यंत ओळखी आहेत. बहिणीला संपवण्याखेरीज कोणताही पर्याय राहिलेला नाही.

आता पुढे आमचं कोणी नाही. जय बाबा बलाकारी, असं त्यानं पोस्टमध्ये नमूद केलं होतं. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबत फॉरेन्सिकचं पथकही पोहोचलं.

फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले. भावनाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन आज करण्यात येईल. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी वर्तवला.