सरफराजला सांभाळून घ्या, वडिलांची भावनिक साद, रोहितने दिलं मन जिंकणारं उत्तर, म्हणाला….

कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर सरफराज खानला अखेर भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आता त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी आपले स्वप्नं सत्यात उतरताना पाहून सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना गहिवरून आले.

त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज खान आपल्या वडिलांना कॅप घालण्यासाठी पळाला. हा क्षण खूपच भावनिक होता.

त्याने वडिलांना आणि पत्नीला मिठीही मारली. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. यावेळी रोहित शर्मानेही नौशाद खान यांचे अभिनंदन केले. दरम्यान, सरफराज खानचा उत्साह वाढवण्यासाठी त्याचे वडील आणि पत्नी देखील राजकोटच्या मैदानावर उपस्थित होते.

दरम्यान, त्यावेळी नौशाद खान त्याला म्हणाले की, सर लक्ष्य ठेवा त्याच्यावर. यावर उत्तर देत रोहित शर्मा म्हणाला की, होय नक्कीच. आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेतली आहे. यामुळे रोहित शर्मा यांच्या या उत्तराने सर्वांची मने त्यानं जिंकली आहेत.

सरफराज खानने सुरुवातीला त्याने चेंडू खेळून काढले. मात्र त्यानंतर त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सरफराज खान फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो. यामुळे तो आता सेट झाल्याचे दिसून आले आहे. संधीचा फायदा घेत त्याने इंग्लिश गोलंदाजांवर हल्लाबोल केला.

आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने अर्धशतकही केलं. ६२ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला जडेजाच्या चुकीमुळे धावबाद होऊन माघारी परतावे लागले. मात्र त्याने त्यांचे कामे करून तो बाद झाला होता. यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.