Team India : रोहित-विराट टी-20 मध्ये करणार पुनरागमन? ‘या’ तारखेला भिडणार भारत-अफगाणिस्तान

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळतील का? दरम्यान, टी-२० विश्वचषकात या दोन्ही दिग्गजांच्या खेळण्याबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहेत. पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० क्रिकेटसाठी परतणार असल्याचं त्यांनी बीसीसीआयला कळवलं आहे. रोहित आणि विराट दोघांनीही २०२२ टी-२० विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. त्यामुळे अफगाणिस्तान टी-२० मालिकेत त्यांची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

रोहित आणि विराटचे पुनरागमन म्हणजे जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही ते खेळतील हे जवळपास निश्चित झालं आहे. रोहित शर्मा टी-२० क्रिकेटचा कर्णधार असल्याने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-२० विश्वचषकात खेळेल.

दुसरीकडे, टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार नाहीत. दुसरीकडे, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा ते टी २० साठी तयार असल्याचे सांगितले आहे.

भारत-अफगाणिस्तान टी२० मालिकेचं वेळापत्रक
पहला टी-२० सामना : ११ जानेवारी, मोहाली
दूसरा टी-२० सामना : १४ जानेवारी, इंदौर
तीसरा टी-२० सामना : १७ जानेवारी, बंगळुरु

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : २५-२९ जानेवारी, हैदराबाद
दुसरा कसोटी सामना : २-६ जानेवारी, विशाखापट्टनम
तिसरा कसोटी सामना : १५-१९ जानेवारी, राजकोट
चौथा कसोटी सामना : २३-२७ जानेवारी, रांची
पाचवा कसोटी सामना : ७-११ जानेवारी, धर्मशाला

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका मोहाली, इंदूर आणि बंगळुरू येथे खेळवली जाणार आहे.