The Kingdom of Iswatini : 15 बायकांना भारतात घेऊन आला होता ‘हा’ राजा, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बुक केल्या होत्या 200 रूम

The Kingdom of Iswatini : इतिहासात तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकले असेल जे त्यांच्या रंगीन मिजाज स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या हरममध्ये अनेक राण्या होत्या. मात्र जगात लोकशाही आल्यावर अशा प्रथा बंद झाल्या. तथापि, जगात अजूनही अनेक देश आहेत जेथे राजेशाही कायम आहे.

असाच एक देश आफ्रिकेत आहे ज्याचे नाव द किंगडम ऑफ इस्वाटिनी आहे. हा देश पूर्वी स्वाझीलँड म्हणून ओळखला जात असे. येथील राजाबाबत एक गोष्ट समोर आली आहे, जी ऐकून संपूर्ण जग हादरले आहे. आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजावून सांगू.

नॅशनल जिओग्राफीच्या अहवालानुसार, या देशात दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लुडझिजिनी नावाच्या गावात उमलंगा सेरेमनी नावाचा उत्सव होतो. देशातील 10 हजारांहून अधिक अविवाहित मुली या उत्सवात सहभागी होऊन राजासमोर नृत्य करतात.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व मुली कपड्यांशिवाय नाचतात. या मुली नाचत असताना, राजा सर्व मुलींकडे पाहतो आणि मग त्यातील एकीची राणी म्हणून निवड करतो. गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला विरोध होत आहे.

2019 मध्ये अनेक कुटुंबांनी आणि मुलींनी यात सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर राजाकडून अशा कुटुंबांवर दंड ठोठावण्यात आला आणि भविष्यात असे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्वाझीलँडचा राजा म्हणजेच इस्वातिनी राजा मस्वती देखील भारतात आला आहे. 2015 मध्ये, मस्वती आपल्या 15 बायका, मुले आणि 100 नोकरांसह भारत आफ्रिका समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. भारताची राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्यासाठी 200 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.