Third Division Club Cricket : ६ चेंडूत ६ विकेट! क्रिकेटमध्ये झाला सर्वात मोठा रेकॉर्ड, विश्वचषक सुरू असतानाच घडली आश्चर्यकारक गोष्ट

Third Division Club Cricket : क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा फलंदाजांना 6 चेंडूत 6 षटकार मारताना पहिले असेल, पण गोलंदाजीत एखाद्या खेळाडूने 6 चेंडूत 6 विकेट घेतल्याचे कधीच घडले नव्हते. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.

त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियातील थर्ड डिव्हिजन क्लब क्रिकेट सामन्यात पाहायला मिळाला. हे अजिबात शक्य वाटत नाही, पण प्रत्यक्षात घडले आहे. ऑस्ट्रेलियाच्या थर्ड डिव्हिजन क्लबचा क्रिकेटर गॅरेथ मॉर्गनने स्थानिक सामन्यादरम्यान सहा चेंडूत सहा विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे.

मुडगेराबा नेरंग आणि डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट क्लबचा कर्णधार मॉर्गन यांनी सहा चेंडूत सहा विकेट्स घेत आपल्या संघाला गोल्ड कोस्ट प्रीमियर लीग थर्ड डिव्हिजन स्पर्धेत सर्फर्स पॅराडाईजविरुद्ध चार धावांनी विजय मिळवून दिला.

मुदगेराबा नेरंग आणि सर्फर्स पॅराडाईज यांच्यात 40 षटकांचा क्रिकेट सामना खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना मुदगेराबा नेरंगने 178 धावा केल्या. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्फर्स पॅराडाईजने 39 व्या षटकापर्यंत 4 गडी गमावून 174 धावा केल्या होत्या.

शेवटच्या षटकात 6 विकेट हातात असताना संघाला विजयासाठी 5 धावांची गरज होती. सर्फर्स पॅराडाईजचा विजय निश्चित वाटत होता, पण मॉर्गन तसे होऊ देणार नव्हता. त्याने डावातील शेवटच्या 6 चेंडूत 6 विकेट घेत करिष्मा साकारला आणि आपल्या संघाला 4 धावांनी विजय मिळवून दिला.

मॉर्गनने शेवटच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर फलंदाजांना झेलबाद केले, तर शेवटच्या दोन फलंदाजांना त्याने गोलंदाजी दिली. अशाप्रकारे मॉर्गनने 16 धावा देत संघाचे सात मोठे बळी घेतले. केवळ गोलंदाजीच नाही तर मुदगेराबाच्या डावात मॉर्गनने 39 धावांची शानदार खेळीही खेळली.