ताज्या बातम्याआरोग्य

Potato : बटाट्यामुळे संपलं सगळं कुटुंब, तुम्ही सुद्धा ‘ही’ चूक करत नाहीत ना?

Potato : असं म्हणतात की जे व्हायचं ते घडतं. जेव्हा मृत्यूच येन लिहिलेलं असत तर मृत्यू कोणत्याही कारणाने येतो. तुम्ही आणि मी कदाचित रोज बटाटे खातो. भारतीय खाद्यपदार्थात, बटाटे जवळजवळ प्रत्येक भाज्यांमध्ये मिसळून तयार केले जातात.

पण तुम्हाला माहीत आहे का की हा बटाटा एका रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या घातक बटाट्यामुळे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. हे संपूर्ण प्रकरण 2013 चे आहे. त्यानंतर रशियामध्ये संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला होता.

या कुटुंबात एकच मुलगी जिवंत राहिली. या कुटुंबावर ना कोणी हल्ला केला, ना त्यांनी विषारी अन्न खाल्ले. बटाटा सर्वांच्या मृत्यूचे कारण ठरला. होय, या कुटुंबाने त्यांच्या घराच्या तळघरात भरपूर बटाटे साठवले होते.

हा बटाटा बाहेर काढण्यासाठी कुटुंबीय आत गेले असता एकामागून एक बटाट्यातून सोडलेले विष हवेत पसरले आणि कुटुंबाचा जीव घेतला. सर्वांच्या मृत्यूचे कारण साठवलेले बटाटे असल्याचे तपासात समोर आले आहे.

वास्तविक, हे कुटुंब भरपूर बटाट्यांचा साठा करत असे. बटाटे गोळा करण्यासाठी ते आत गेले असता सडलेल्या बटाट्यातून गॅस बाहेर आल्याने त्याचा गुदमरला. कुजलेल्या बटाट्यातून निघणारा हा वायू इतका विषारी होता की, श्वास घेताच प्रत्येकाला जीव गमवावा लागला.

मारियाचा जीव वाचला कारण तळघरात येण्यापूर्वी आजीने दरवाजा उघडा ठेवला होता. अशा परिस्थितीत मारिया येण्यापूर्वी खोलीतील विषारी वायूचे प्रमाण कमी झाले होते.

नुकतीच या कुटुंबाची शोकांतिका सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. याद्वारे लोकांना चुकूनही बटाटे बंद खोलीत ठेवू नयेत, याची जाणीव करून देण्यात आली. अन्यथा असा अपघात होऊ शकतो.

Related Articles

Back to top button