Virat Kohli : सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी सामने सुरू आहेत. यामध्ये भारताला पहिल्याच कसोटीत पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले पण भारताला तब्बल एका डावाने पराभव पत्करावा लागला.
यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या खेळीबाबत आपले मत व्यक्त केले. विराट कोहली हा एकाकी झुंज देत होता. विराटने अर्धशतकही झळकावले. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. यामुळे टीमच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
रोहित म्हणाला की, जिंकण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, असे मला वाटते. आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या डावात तर आम्हाला चांगली फलंदाजीही करता आली नाही. विराटने चांगला खेळ केला. पण जिंकण्यासाठी मात्र सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे असतात.
या सामन्यात मात्र आमच्याकडून तस काही झाले नाही. आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच आम्हाला विजय मिळाला नाही. लोकेश राहुलनेही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली होती. पण चांगल्या भागीदाऱ्या होऊ शकल्या नाहीत तिथेच सामना आमच्या हातून निसटत गेला.
आम्हाला वातावरण आणि खेळपट्टीशी जुळवून घेता आले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र येऊ आणि सर्व गोष्टींवर विचार करू, असेही रोहित शर्मा म्हणाला. आम्ही दक्षिण आफ्रिकेत जास्त कसोटी सामने खेळलो नाही आणि याचाही आम्हाला फटका बसला.
दरम्यान, आता येणाऱ्या सामन्यात टीम कसा खेळ करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता टीममध्ये काही बदल देखील होतोय का हे बघणे देखील महत्वाचे आहे. क्रिकेटप्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे.