Yuzvendra Chahal : मुंबई: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्स इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या प्रकरणात युजवेंद्र चहलने धनश्रीला ४.७५ कोटी रुपयांची पोटगी देण्यास सहमती दर्शवली. या पोटगीचे कारण काय असू शकते, यावर चर्चा सुरू आहे, विशेषतः जरी धनश्री ही एक कमावती महिला असली तरी चहलने तिला पोटगी का दिली, याचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
धनश्री वर्मा ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिच्या इंस्टाग्रामवर ५६ लाख फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर तिचे २.३ मिलियन लोक फॉलो करतात. सोशल मीडियावरून तिला मोठ्या प्रमाणावर कमाई होत आहे. याव्यतिरिक्त, धनश्री डान्सिंग देखील शिकवते, ज्यातून तिला चांगले पैसे मिळतात. तिच्या नावावर २४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
युजवेंद्र चहलची संपत्ती काही वेगळी नाही. चहलने आयपीएलमधून आतापर्यंत ६० लाख रुपये कमावले आहेत. त्याचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत २५ लाख रुपये आहे. त्याला इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून दरमहा १.३५ लाख रुपये पगार मिळतो आणि तो वर्षाला जाहीरातींमधून २ कोटी रुपये कमावतो.
तरीही, धनश्री कमावती असतानाही चहलला पोटगी का द्यावी लागली? यावर चर्चा आहे. युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये खेळत असताना हे प्रकरण सुरू राहील, असे त्याला परवडणारे नव्हते. कारण पंजाब किंग्सने चहलसाठी १८ कोटी रुपये मोजले होते. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीला चहलला कौटुंबिक तणाव नको होता, ज्यामुळे त्याने घटस्फोट आणि पोटगीसाठी लवकरात लवकर निर्णय घेतला.
चहलने धनश्रीला दिलेली पोटगी त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय असावा, जेणेकरून आयपीएलमध्ये तो कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाशिवाय खेळू शकेल.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील घटस्फोटाचे अधिकृत स्पष्टीकरण अजून आले नाही, मात्र चहल आणि धनश्री यांच्यापासून कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया येईल का, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.