ODI World Cup : वर्ल्डकपचे Live सामने आता तुम्ही पाहू शकता फ्री मध्ये! फक्त करावी लागणार ‘ही’ एकच गोष्ट

ODI World Cup : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 13व्या आवृत्तीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबरला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

याच मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. त्याने 1983 आणि 2011 मध्ये विजेतेपद पटकावले होते. मागच्या वेळी जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली तेव्हा वर्ल्ड कप भारतातच आयोजित करण्यात आला होता.

या सामन्याचा एकही क्षण तुम्हाला चुकू नये, असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता. कारण या वर्ल्ड कपचे सामना हे फ्रीमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत.

या वर्ल्ड कपमधील सामने (ODI World Cup) हे स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर पाहायला मिळणार आहे. स्टार स्पोर्ट्स समुहाकडून इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून वर्ल्ड कपचे सामने लाइव्ह पाहायला मिळू शकतात.

जर तुम्हाला वेब स्टाईट किंवा अॅपवर हा सामना पाहायचा असेल तर त्यासाठी Disney+Hotstar वर तुम्हाला हे सामने पाहता येतील. स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी पैसे मोजावे लागतील. पण जर हा सामना तुम्ही मोबाईलमध्ये Disney+Hotstar वर पाहिलात तर तो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळू शकतो.

कारण हा सामान जर अन्यत्र कुठे पाहायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. पण हा सामना त्यांच्या अॅपवर फ्रीमध्ये दाखवला जाणार आहे. त्यामुळे मोबाईलवर आता तुम्हाला फ्रीमध्ये हा सामना पाहायला मिळू शकतो.

यावेळीही संघाकडून विजेतेपदाच्या अपेक्षा आहेत. विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे स्पर्धा आहेत.

या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. 10 पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता.

त्यानंतर इंग्लंड संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत. यजमान भारताशिवाय श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि इंग्लंड हे संघ भाग घेत आहेत.