पुणे कार अपघात प्रकरणातील युवराजांचा निबंध आला समोर, नेमकं काय लिहिलंय? वाचा…

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे पोर्श अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे याची चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्यांना सोडण्यात आले होते. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन बिल्डर धनिक अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळाने सांगितल्यानुसार अपघात प्रकरणावर ३०० शब्दांचा निबंध लिहून कोर्टात सादर केला आहे. यामुळे त्याने नेमकं काय लिहिलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या निबंधामध्ये सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

वाहतूक नियमांचे पालन करणे का आणि कसे गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे, याबाबत या अल्पवयीन आरोपीने माहिती लिहीली आहे. माझ्याकडून अपघात घडला, अपघात झाल्यानंतर मला पोलिसांची भीती वाटत होती.

त्यामुळे मी पळून जाण्याच्या मानसीकतेत होतो. लोकांनी मला मारहाण देखील केली, मात्र अपघात झाल्यानंतर पळून जाऊ नका. पोलिसांना शरण या. अपघाताची माहिती द्या. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पोलीस करतील. अपघातग्रस्तांना शक्य तितकी मदत करा.

अपघात झाल्यानंतर तुम्ही पळून गेलात तर अडचणीत याल’ असे या अल्पवयीने आरोपीने आपल्या निबंधात म्हटले आहे. यामुळे त्याने ज्या चूका केल्या आहेत, त्या न करण्याचा संदेश त्याने दिला आहे. पुण्यात १९ मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडले.

दरम्यान, या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही अलिशान कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं, अपघात घडल्यानंतर तिथे असल्येल्या नागरिकांकडून या मुलाला मारहाण देखील करण्यात आली.

मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे पोहोचलं, बाल न्याय मंडळानं या आरोपीला अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावत त्याला जामीन दिला होता. आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानं पुणेकरांमध्ये संतापाचं वातावरण होतं.

पुढे न्यायालयाने या मुलाचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली. आरोपीला तपासणीसाठी रुग्णालयात नेले असताना त्याचा ब्लड रिपोर्ट देखील बदलण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे यामध्ये अनेकजण अडकले, त्यांना देखील अटक केली आहे.