Allahabad PCB Hostel : वसतीगृहाच्या रूममध्ये मोठा धमाका, आत रक्ताचा सडा; पोलिसांना छताला दिसले मांसाचे तुकडे, नेमकं काय घडलं?

Allahabad PCB Hostel : अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पीसीबी हॉस्टेलच्या रूम नंबर 68 मध्ये बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटामुळे प्रभात नावाचा विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या एका हाताचा पंजा उडून गेला होता आणि त्याच्या छातीवर बॉम्बचे तुकडेही लागले होते.

हा विद्यार्थी पीसीबीच्या या खोलीवर कब्जा करून बेकायदेशीरपणे राहत होता. कर्नलगंज पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसी बॅनर्जी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला बुधवारी बॉम्ब बनवताना स्फोट झाल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला गंभीर अवस्थेत एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त (शिवकुटी) राजेश कुमार यादव यांनी सांगितले की, प्रभात यादव हा अलाहाबाद विद्यापीठातील एमएचा विद्यार्थी पीसी बॅनर्जी वसतिगृहात राहतो आणि आज संध्याकाळी तो बॉम्ब बनवत असताना अचानक झालेल्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला.

त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत आणखी एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारीच्या आधारे पोलीस प्रभात यादवविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अलाहाबाद विद्यापीठात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. वसतिगृहात बेकायदेशीर कृत्ये होत असल्याचा आरोप अनेक विद्यार्थी गटांकडून केला जात आहे.