चिकनसाठी भावानेच केला भावाचा खून, वार करून अवयवच बाहेर काढले, उडाली खळबळ…

सध्या राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील अलवरमधील तिजारा भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने मोठ्या भावाची चाकूने हत्या केली आहे. या हत्येचे कारण समजल्यावर सगळ्यांचा धक्का बसला.

याबाबत माहिती अशी की, मोठा भाऊ घरी चिकन घेऊन आला होता. त्याने लहान भावाला चिकन बनवायला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की त्याच्या शरीरातील अवयव बाहेर आले.

तिजारा पोलिस ठाण्याच्या शाबाद गावात राहणारे किशोरी लाल यांना तीन मुलं आहेत. घर चालवण्यासाठी तिघेही मजुरीचे काम करतात. त्यातील भुड्डन नावाच्या मुलाने बाजारातून चिकन आणले होते. मात्र नंतर घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

घटनेच्या दिवशी भुड्डनने लहान भाऊ जगदीशला चिकन बनवायला सांगितले. याचा राग जगदीशला आला आणि चिकन बनवायला नकार दिला. यामुळे दोघांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद आई मिटवायला आली मात्र तिला देखील धक्काबुक्की करण्यात आली.

त्यांचा कालवा बघून गावातील लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दोघांमधील वाद वाढतच गेला. जगदीशने घरात ठेवलेला मांस कापण्याचा चाकू आणून भुड्डनच्या पोटात वार केले. यामुळे तो रक्तबंबाळ झाला.

त्याच्या शरीरातील अवयवही बाहेर आले. घटनेनंतर जगदीशने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी कुटुंबीयांनी भुड्डन यांना तत्काळ तिजारा येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा मृत्यू झाला होता.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनेनंतर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी याबाबत पथके रवाना केली असून त्याचा शोध घेतला जात आहे.