राज्यात शिंदे गटाला किती जागा, अजित पवार खात उघडणार का? माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य…

सध्या देशात लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मतदान झाले आहे, तर काही ठिकाणी अजून मतदान होणार आहे. याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा अंदाज व्यक्त केला आहे.

याबाबत ते म्हणाले, ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता हा निकाल कसा असणार हे लवकरच समजेल. चव्हाण म्हणाले, भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे. गेल्या दोनवेळा सहजपणे त्यांनी हा आकडा गाठला होता. आता देशात आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. लोकांमध्ये नाराजी आहे.

याचा परिणाम दिसणार आहे. इंडिया आघाडीच्या २४० ते २६० जागा निवडून येतील, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहेत. यामुळे भाजपने अनेकांना फोडले.

या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेले नाही. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे याबाबत स्पष्टता नाही, असे ते म्हणाले. यामुळे आता चव्हाण यांचा हा दावा किती खरा ठरणार हे लवकरच समजेल.

दरम्यान, निकालाची तारीख जशी जशी जवळ येत आहे, तशी तशी धाकधूक वाढली आहे. यामुळे आता राजकीय पक्ष आणि लोकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता काही दिवस उरले असून याबाबत लवकरच निकाल समोर येणार आहे.

राज्यात शिंदे गटाला तीन ते चार तसेच अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीला राज्यात 32 ते 35 जागा मिळू शकतात, असेही ते म्हणाले. यामुळे त्यांचा हा अंदाज किती खरा ठरणार हे लवकरच समोर येणार आहे.