Budget 2024 : आयकर प्रणालीमध्ये बदल नाही, किती उत्पन्नावर टॅक्स नाही? जाणून घ्या…

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आहे. यामुळे याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. यामुळे यामध्ये मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचे सांगितले जात होते.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात तशा तरतूदी केल्याचे दिसून आले. करदात्यांचे आभार मानत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करास पात्र नसेल असे सांगितले.

यामुळे यंदा जुनीच करप्रणाली लागू राहणार असून, आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच इतर निर्णयांमध्ये ई-वाहन, रेल्वे समुद्र मार्ग जोडण्यासाठीचे प्रकल्प यावर सरकार भर देईल. पर्यटनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीही सरकार काम करेल.

तसेच वंदे भारतसाठी 40 लाख डब्यांची निर्मिती करणार. मेट्रो, नमो गाड्यांचं जाळं उभारणार, यावेळी त्यांनी 50 वर्षांच्या व्याजदरमुक्त कर्ज देण्याची हमी देत 1 लाख रुपयांच्या कॉर्पसला अधोरेखित केलं. तसेच देशभरात लखपती दीदी या उपक्रमाला दुजोरा देण्यात आला.

यामुळं 9 कोटी महिलांच्या जीवनात बदल झाला आहे, त्यामुळं त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. अंगणवाडी उपक्रमांनाही वेग आला असून, 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत, असेही यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तसेच सरकारकडून मध्यमवर्गीयांसाठी गृह योजना तयार करण्यात येणार आहे.

तसेच चाळी, झोपडपट्टी किंवा बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये जे नागरिक राहतात त्यांना घर खरेदी किंवा उभारणीसाठी सरकार मदत करणार आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरं बांधण्यात आली आहेत. आता सरकार मध्यम वर्गातील लोकांसाठी घरांची योजना आणणार आहे, असेही त्यांनी सांगितले.